पुणे – शहरात सलग चौथ्या दिवशी करोनाच्या नवीन बाधितांची संख्या अडीचशेच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 258 नवे बाधित सापडले असून, 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर-5, आणि अन्य जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात 350 जण करोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहरात आतापर्यंत 10 लाख 64 हजार 700 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यातील 1 लाख 94 हजार 309 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आजपर्यंत 1 लाख 87 हजार 995 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर 4 हजार 794 बाधितांचा मृत्युची नोंद झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 12) दिवसभरात 3 हजार 382 संशयितांची तपासणी करण्यात आली. सक्रीय बाधितांची संख्याही काहीशी वाढत आहे. सध्या 1 हजार 520 बाधितांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 135 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 237 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.
मास्क वापराच…
पुण्यासह राज्यात काही ठिकाणी करोना बाधित वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. अशा वेळी मास्क, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.