पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये शुक्रवारी पुणे जिल्ह्यात विक्रमी 1 लाख 37 हजार 72 जणांचे लसीकरण झाले. तब्बल 772 लसीकरण केंद्रांवर ही मोहीम पार पडली. त्यामध्ये 557 शासकीय आणि 215 खासगी लसीकरण केंद्राचा समावेश आहे.
करोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा पुरवठा झाला, तर जिल्ह्यात दररोज एक ते दीड लाख लसीकरण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले. सध्या लसीचा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला आहे.
त्याचबरोबर खासगी रुग्णालयांकडूनही मोठ्या प्रमाणात लस खरेदी केल्यामुळे शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लाभार्थींची रांग लागली आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यात दिवसात विक्रमी 85 हजार जणांचे लसीकरण झाले आहे.