पुणे: आज पुण्यात सायंकाळी पाऊणे सहा वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली. रोज अचानक पाऊस हजेरी लावत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. या पावसामुळे शेतकरी,व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते, त्यानंतर तुफान पाऊस हा पावसाचा रोजचाच दिनक्रम झाला आहे. त्यात पुण्यात अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
परतीचा पाऊस गेला, तरीही मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर दि. 6 आणि 7 नोव्हेंबरला शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.