नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील राजपथाची पुर्नरचना करण्यासाठी पंतप्रधान निवासस्थान सात लोककल्याण मार्ग येथून स्थलांतरित करून राष्ट्रपती भवनाच्या दक्षिणेकडील डलहौसी रस्त्यावरील हटमेंट्समध्ये हलविण्यात येणार आहे. असा प्रस्थाव वास्तूरचनाकार संस्था सेंट्रल व्हिस्टाने दिला आहे.
हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून, यासाठी १२००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये शास्त्री भवन, उद्योग भवन आणि कृषि भवन यासारख्या १२ सरकारी कार्यालयांच्या जागी एकाच परिसरात ही सर्व कार्यालये तयार करण्यात येणार आहेत.