पुणे- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मे आणि जून महिन्यात या प्रवेश परीक्षा होणार आहेत.
राज्य सीईटी सेलने संभाव्य वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यापूर्वीच राज्य सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यात बीपीएड, बीए-बीएड- बीएस्सी-बीएड, बीएड-एमएड, एमपीएड, एमएड, पाच व तीन वर्षीय विधी अशा आठ अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज नोंदणी, परीक्षेचा दिनांक याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षा मेच्या पहिल्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील.