पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, मनिष सोनिग्रा, चैतन्य जगताप, दीपक जोशी, महिला पदाधिकारी बॉबी करणानी, पल्लवी गाडगीळ, गीता जेसवानी, शालू परिहार, अंजली तुरारे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धध्वस्त करून ८ आरोपींना अटक केली. पुणे पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कामगिरी ठरली. याबद्दल हा सन्मान करण्यात आला. ड्रग्स जप्त केल्याने ते तरुण पिढीपर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे अनेकजण व्यसनाधीन होण्यापासून वाचले, ही पोलिसांची मोलाची कामगिरी असल्याचे कपोते म्हणाले.