पुणे – मुंबईतील अाॅर्थर राेड कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील चेंबूर परिसरात अमेरिकेतील शिकागाेच्या धर्तीवर बहुमजली कारागृह इमारत लवकरच बांधण्यात येईल त्याचसाेबत पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील जागेवर नवीन कारागृह बांधण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सांगली जिल्हयातील आटपाडी येथे ज्याप्रमाणे पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे. त्याप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहास शनिवारी त्यांनी भेट देत कारागृह प्रशासानाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी पाेलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, अपर पाेलीस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक याेगेश देसाई, कारागृह अधीक्षक यु.टी.पवार उपस्थित हाेते. यावेळी गृहमंत्री यांचे हस्ते २०१९-२० सांख्यिकी पुस्तिकेचे विमाेचन करण्यात आले.