पुणे – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पुणे शहरातील मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, याआधीही नरेंद्र मोदींचा पुणे दौरा नियोजित होता, परंतु काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.