भोर – शिवजयंतीनिमित्त भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकी सुमारे 200 फुट दरीत कोसळली. पहाटे साडेतीन वाजता वरंधा घाटात कावळे किल्ल्याजवळ ही घटना घडली.
केतन देसाई (वय 23), प्रथमेश गरुड (वय 25) आणि किरण सुर्यवंशी (वय 20, तिघेही राहणार भोंगवली) अशी अपघातात जखमींची नावे आहे. दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.