पुणे – अपूर्वसंध्या ही सांगितीक मैफिल दि. १८ रोजी डि. ई. एस. सोसायटीच्या गणेश हॉल येथे पार पडली. अपूर्वा कुलकर्णी यांची संकल्पना असलेला व संतोष कुलकर्णी यांचे संयोजन असलेला हा संगीत विषयक कार्यक्रम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजोजित करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतार वादक समिप कुलकर्णी यांनी त्यांच्या शिष्या -कन्या सान्वी व सोहना कुलकर्णी यांच्या सह सतार वादनाचे विविध प्रकार सादर केले ज्यामधे गणेश वंदना, केदार राग यांचा समावेश होता. याच बरोबर सारिका कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांनी हिंदी व मराठी गीते सादर केली.
मध्यंतरानंतरच्या सत्रात स्पृहा कुलकर्णी, तनिष्का गद्रे व ईश्ना वाळुंज या बाल कलाकारांनी तसेच सारिका कुलकर्णी, माधवी पारनाईक,ज्ञानदा काळे, प्राची आपटे, नेहा आपटे या कलाकारांनी त्यांची गायनकला सरगम, बंदीश, अभंग, भक्तीगीते व भावगिते या माध्यमातून सादर केली.
आयोजिका अपूर्वा कुलकर्णी यांनी गायन तसेच सिंथेसाईजर चे वादन या कला सादर केल्या. कार्यक्रमाचा शेवट स्वराली कुलकर्णी यांच्या गिटार व अपूर्वा कुलकर्णी यांच्या सिंथेसाईजर या दोन वाद्यांच्या मिलाफातून झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अपूर्वा कुलकर्णी व सूत्रसंचालन मोहना गद्रे यांच्या निवेदनाने कार्यक्रमास रंगत आली.