पुणे : रांजणगाव एमअायडीसीतील कंपनीत काम करणारे सुरक्षारक्षक रामदास केदार (वय-21,रा.ढाेकसांगवी, ता.शिरुर, पुणे) यांना 20 फेब्रुवारी राेजी संध्याकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास अायटीअाय काॅलेजकडून कारेगावकडे जाताना अंधाराचा फायदा घेत चार चाेरटयांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचेकडील मोबाईल व राेख रक्कम पळवून नेलक्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पाेलीसांचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन अाराेपींसह चारजणांना जेरबंद केले आहे.
विकास राेडे (रा.शिरुर,पुणे) असे अटक करण्यात अालेल्या अाराेपीचे नाव अाहे. त्याचे तीन अल्पवयीन साथीदार पाेलीसांनी शिरुर तालुक्यातील कारेगाव, बाभूळसर खुर्दल करडे या गावातून ताब्यात घेतले अाहे. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली अाहे.
रांजणगाव एमअायडीसीतील कामगार राेहित खवळे हा सुध्दा पायी जाताना अाराेपींनी त्याला अशाचप्रकारे अडवून मारहाण करत त्याचा माेबार्इल व राेख रक्कम चाेरुन नेली हाेती. पाेलीसांनी अाराेपींकडून संबंधित दाेन गुन्हे उघडकीस आणत आरोपींच्या ताब्यातून चाेरीचे माेबार्इल व गुन्हयात वापरलेली माेटारसायकल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांनी दिली आहे.