“अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकार चौकशीचे ढोंग करते”

मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, याच घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ‘आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. ‘ तसेच  त्यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले ज्यांनी आज  हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांचे ट्विट रिट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘ज्यांच्यावर राज्यातील महिलांचे / मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या समोरच आज राज्यातील आई बहिणींच्या इज्जतीचे धिंडोरे निघत आहे .महाविकास आघाडी सरकार चौकशीचे ढोंग आहे ‘ असं रिट्विट करत त्यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, विधानसभेत या मुद्यावरून ते म्हणाले, ‘हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.