पुणे – 4 जूनला मार्केटयार्ड राहणार बंद

पुणे – माथाडी, हमाल, कामगार कायद्याला 5 जून 2019 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 4 जून रोजी मार्केटयार्डातील कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे यांनी दिली.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. केंद्राच्या मजुर खात्याने देशभरातील अंगमेहनती असुरक्षित कष्टकऱ्यांसाठी माथाडी कायद्याची शिफारस केली आहे. राज्यांनीही या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे. देशात आता अंगमेहनती कष्टकऱ्यांची संख्या 50 कोटीपर्यंत पोहोचली आहे. ज्यांना कोणत्याही कामगार कायद्याचे संरक्षण नाही. त्यांच्यासाठी हा कायदा उपयुक्‍त आहे. या कायद्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार न पडता कष्टकऱ्यांना ओळखपत्र, भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजेचा पगार, नुकसान भरपाई कायदा आणि वैद्यकीय मदत आदी सुविधा उपलब्ध होतात. 5 जानेवारी रोजी रमजान ईद आहे. सुट्टी असल्याने 4 जून रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसिलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे थोपटे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)