पुणे – रोटरी सेवा पुरस्कार रोटरीच्या आंतरराष्ट्रीय मूल्ये आणि उद्दिष्टे अमलात आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केला जातो . ज्यांनी समुदायांसाठी आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित सेवा केली आहे अशा व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. २०२३-२४ चा हा मानाचा पुरस्कार प्रथितयश उद्योजक कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा सर्वश्री कृष्णकुमार गोयल ह्यांना समारंभपूर्वक रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षांचे प्रतिनिधी श्री मायकेल मॅकगवर्न ह्यांच्या हस्ते प्रदान केला गेला.
ह्याप्रसंगी रोटेरी ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर व क्रेडाई कुशलचे जे पी श्रॉफ उपस्थित होते . श्री मॅकगवर्न ह्यांनी ह्याप्रसंगी श्री गोयल ह्यांच्या प्रदीर्घ समाजसेवेचा गौरव केला. श्री गोयल ह्यांनी ह्याप्रसंगी पुरस्काराबद्दल रोटरी इंटरनेशनल चे आभार मानले . क्रिएट होप इन द वर्ल्ड हे २०२३ २४ ह्या रोटरी वर्षाचे बोधवाक्य आहे. श्री गोयल आपल्या कृष्णकुमार गोयल फौंडेशन मार्फत पर्यावरण, शिक्षण , आरोग्य अशा अनेक क्षेत्रात सामाजिक प्रकल्प राबवत आहेत. तसेच पर्यावरण पूरक “रोटरी ग्रीन सोसायटी” प्रकल्प कोहिनुर ग्रुपच्या सर्व प्रकल्पात राबवायचा मानस त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केला.