Pune | जागेचा ताबा घेण्यासाठी जमला 300 जणांचा जमाव; जागा मालकावर दगडफेक

पुणे,दि.4- बांधकाम व्यवसायीकाकडून जबरदस्तीने जागेचा ताबा घेण्याचा प्रकार खराडी येते घडला. त्याने जवळपास 200 ते 300 व्यक्ती एकत्र आणून जागेवर बॅरिकेटस उभारुन काम करण्यास सुरवात केली होती. जागा मालकाने प्रतिकार केला असता त्याला शिवीगाळ करत दगडे अंगावर फेकण्यात आली.

याप्रकरणी आरीफ बेग (47,रा.स.नं./,खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार डेव्हलपर्सचे संचालक व त्यांचे 200 ते 300 अनोळखी बांधकाम कामगार महिला व पुरूष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी यांचे घरासमोर खासगी डेव्हलपर्सचे संचालक याचे सांगणेवरु 200 ते 300 महिला व पुरूष कामगारांचे वेशात आले होते. त्यांनी बेकायदेशीररित्या जमा होवुन न्यायालयाने दिवाणी दाव्यामध्ये दिलेल्या आदेशाचा भंग करुन,फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांचे ताबेवहिवाटीच्या जागेत व रस्त्यावर बॅरीकेटस उभी करुन काम करणेस सुरूवात केली.

फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांनी प्रतिकार केला असता, आरोपी यांनी फिर्यादीस व कुटुंबियांना शिवीगाळ करुन,धक्का-बुक्की केली . यानंतर जीवे मारण्याची धमकी देवुन,दगडे अंगावर फेकुन मारुन जखमी केले तसेच फिर्यादी यांचे घरासमोर लावलेल्या गाडयांचे पत्रे तसेच काचा फोडुन नुकसान केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र ढवळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.