पुणे – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते ‘ऑस्ट्रेलियन ऍडव्हान्स थ्रीडी डायमेन्शन सिम्युलेटर’चे (Australian Advanced 3D Dimension Simulator) उद्घाटन आज सी. आय. आर. टी. पुणे येथे पार पडले. सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांनी अत्याधुनिक ऍडव्हान्स थ्री डी डायमेन्शन सिम्युलेटर द्वारे वाहन चालकांना प्रशिक्षित करावे, असे आव्हान नितीन गडकरी यांनी केले. याप्रसंगी गडकरी यांचे स्वागत मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष विलास आपटे, वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार, कोषाध्यक्ष ऍड. निलेश गांगुर्डे, टेक्निकल हेड महाराष्ट्र राज्य अनुज शिंदे, पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे सुरज देवकर, कृषी सम्राट शरदचंद्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष कपटकर, या मान्यवरांनी स्वागत केलं. तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र विवेक भिमानवार, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग शेखर चने, अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड अतुल आदे, सचिव वाहन चालन प्रशिक्षण संस्था भोसरी राजकुमार, शेखर ढोले, प्रशांत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.