पुणे – अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्यातर्फे संवाद टॉपर्स मार्गदर्शन – राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी (दि.२५) रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. नवी पेठ येथील अहिल्या अभ्यासिकेशेजारील संकल्प मंगल कार्यालयात हे मार्गदर्शन सत्र होणार आहे.
यामध्ये राज्यसेवा २०२२ च्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेले विनायक पाटील, मुलींमधून प्रथम आलेल्या पूजा वंजारी यांच्यासह धनंजय बांगर, सोनल सूर्यवंशी, वैभव पडवळ, विशाल नवले यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षीच एमपीएससीचे मैदान गाजवणारे मुदाळ ता. भुदरगड जि. कोल्हापूरविनायक पाटील, तर लग्नानंतर अभ्यासात खंड पडतो म्हणून मुली उशिरा लग्न करतात.
परंतु, लग्नानंतर दोन वर्षांनंतरही पूजा वंजारी यांनी राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संवाद टॉपर्स-मार्गदर्शन राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत. स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासासाठी आलेल्या या उमेदवारांना परीक्षांच्या तयारीची योग्य दिशा मिळावी, या परीक्षांमध्ये यश कसे मिळवावे, याबाबत राज्यसेवा परीक्षा २०२२ मधील टॉपर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उमेदवारांनी मोठ्या संखेने या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. शैलेश पगारिया, महेश बडे, किरण निंभोरे, डॉ.अतिश चोरडिया, स्वराज पगारिया, अंकुश धवणे यांनी केले आहे.