जळोची- परिवहन सेवेत वाहन हस्तांतरित करण्यासाठी राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक कार्यालयाची नावे दिली आहेत. त्यातील एका कार्यालयाची निवड करून वाहन हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून होत नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने एनओसी काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
शासनानेच परिवहन सेवेमध्ये वाहन हस्तांतरीत करण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे राज्यातील कोणत्याही एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरीत करून देण्याचे आदेश बारामती उप्रादेशिक परिवहन कार्यालयास देऊन सामान्य जनतेची होणारी अडवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून वाढू लागली आहे.
महाराष्ट्र राज्यात यापूर्वी वाहनांची एनओसी दिली जात होती. परंतु ती बंद करण्यात आली. परिवहन ऑनलाइन सेवेमध्ये वाहन हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची नावे दिली आहेत.त्यातील एका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निवड करून वाहन हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. असे असूनही बारामती कार्यालयाकडून ही सुविधा का उपलब्ध करून दिली जात नाही, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन हस्तांतरित करण्यासाठी एनओसी दिली जात होती. परंतु ती बंद करण्यात आली. वाहन हस्तांतरण करण्यासाठी परिवहन या ऑनलाइन सेवेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नावे शासकीय नियमानुसार एनआयसीकडून उपलब्ध करून देण्यात आली.
त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील एका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निवड करून आपणास आवश्यक असणाऱ्या (चॉईस नुसार) कोणत्याही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरीत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे असूनही बारामती कार्यालयात नोंद असलेले वाहन महाराष्ट्र राज्यातील इतर दुसऱ्या कोणत्याही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आदी जिल्ह्यीाल शासकीय नियमानुसार एलआयसीने सुविधा उपलब्ध करून दिलेली असूनही वाहन हस्तांतरित का केले जात नाही. याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहन हस्तांतरित अपेक्षित
वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर पडकर म्हणाले की, यापूर्वी राज्यातील कोणत्याही एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुसऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरित करण्यासाठी एनओसी दिली जात होती.परंतु शासनाने एनओसी देणे बंद करून परिवहन सेवेत वाहन हस्तांतरित करण्यासाठी राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नावे उपलब्ध करून दिली.
त्यानुसार राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहने बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हस्तांतरीत केली जातात.याऊलट मात्र बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून राज्यातील सर्व एमएच -01 ते एमएच-56 कोणत्याही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.