नीरा -पुणे-पंढरपूर अरुंद पालखी महामार्गावर एसटी बस रस्ता सोडून खाली गेली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच बस चालकाला बस चावलण्यापासून रोखले आणि लक्षात आले. चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. पुण्यात डिव्हायडरला धडक, जादा रेस, तर कधी नागमोडी बस चालली. थोपटेवाडी फाटा येथे डांबरी रस्ता सोडून साइडपट्टीवरून सुसाट वेगात चाललेली बस प्रवाशांनी आरडाओरड करून रोखली.
मोहन इंगुळकर (रा. वेल्हा) व मंगल पाटोळे (रा. पंढरपूर) या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्वारगेट-सांगोला ही एसटी दुपारी 1:30 वाजता निघालेली होती. स्वारगेट बस स्थानकाबाहेरच डीव्हायडरला धडकली होती. त्यानंतरही बस झोला मारत होती. कधी वेगात तर कधी रेस करीत बसचा प्रवास सुरु होता. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून तर बस नागमोडी चालू लागली.
एक क्षणाला तर समोरुन येणाऱ्या ट्रकला कट ही बसला. त्यानंतर बसने डांबरी रसता सोडून थेट साईडपट्टीवरून प्रवास सुरू केला. त्यामुळे प्रवाशी भयभीत झाले. आता प्रवाशांच्या लक्षात आले बहूतेक चालक दारु पिऊन बस चालवत आहे आणि तो अंदाज खरा ठरला. प्रसंगावधान दाखवत लागलीच प्रवाशांनी ओरड केली. वाहकाने चालकाला बस थांबण्याची विनंती केली.
पुणे विभागाचे लाईन चेकर सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख, वसंत रावते, रफिक आतार हे योगायोगाने नीरा परिसरातच होते. शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांत दिले. बस नीरा स्थानकात आणून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. प्रवाशांनी चालकाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
चालक पोलिसांच्या ताब्यात
सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर 52 प्रवासी घेऊन सांगोला आगाराची स्वारगेट सांगोला बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थेत बस का उभी आहे हे पाहिले असता चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय 32, रा. लातूर डेपो सांगोला) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रवीण बुरंजे (सांगोला डेपो) हे होते. प्रवाशांनी चालक दारू पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांकडे दिले.त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.