बाजार समितीच्या याचिकेवर मंगळवारी अंतिम सुनावणी : निकालाकडे नेत्यांचे लक्ष
प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा – पुणे जिल्ह्यामध्ये 10 बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु झाला आहे. निवडणुकीची लगीनघाई सुरू असताना शिरूरच्या मैदानात शांतता दिसून येत आहे. शिरूर तालुक्यातील बाजार समितीचा समावेश नसून व्यापारी मतदारसंघातील मतदारयादी संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्यापही जाहीर झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयाकडे तालुक्यातील सर्वपक्षीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिरूर तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गट व अन्य गटातील कार्यकर्त्यांनी जोरदार कंबर कसली आहे.सध्या बाजार समितीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणूक कार्यक्रम स्थगित असल्याने सगळीकडे शांत वातावरण आहे.
बाजार समितीवर शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे. शिरूर बाजार समितीची अंतिम मतदार यादी (दि.20) प्रसिद्ध होणार होती. व्यापारी मतदारसंघातील याद्यात काही नावे नसल्याच्या अनुषंगाने 16 रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
याचिकेवर अंतिम सुनावणी (दि.11) होणारा आहे. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिरूर तालुक्यातील बाजार समितीचा समाजोरदार फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षांकडे गर्दी असल्याने यात कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणाचा भ्रमनिरास होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी व्यापारी गटातील मतदार यादीसंदर्भात याचिका दाखल झाली असून, उच्च न्यायालयात याबाबत 11 एप्रिल रोजी अंतिम सुनावणी आहे. सुनावणीनंतर खऱ्या अर्थाने निवडणूक कार्यक्रमाबाबत कळेल.
अनिल ढोकले, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर