पुणे – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना मुंबई महामार्गावर परिवहन विभागाने डिसेंबरमध्ये, वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 660 वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये काही गाड्यांचा वेग प्रतितास 160 कि.मी हून अधिक असल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांनी वेगावर नियंत्रण राखावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
परिवहन विभागाने एक डिसेंबरपासून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमागे अपघात रोखने हा एकमेव उद्देश असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर होणारे अपघात अतिवेग, झोप लागणे, लेन कटींग अशा मानवी चुकांमुळे झाल्याचे समोर आले आहे.