पुणे – दिवंगत मित्राच्या स्मरणार्थ दरवर्षी रक्तदान शिबीर भरवत मैत्रिचे नाते निभावले जात आहे. हा उपक्रम अक्षय पवार मित्र परिवाराच्या वतीने राबवला जात आहे. यंदा शिबीराचे पाचवे वर्ष असून जवळपास सव्वाशे बाटल्या रक्तसंचलन करण्यात आले
अक्षयचा पाच वर्षापुर्वी १४ फेब्रुवारी रोजी अपघातामध्ये मृत्यू झाला होता. अतीशय कमी वयातच त्याचा मृत्यू झाल्याने मित्रांना एक प्रकारे धक्काच बसला होता. मात्र त्याची आठवणी निरंतर रहाव्यात यासाठी काही ठोस करावे म्हणून त्याचे मित्र एकत्र आले. त्यांनी त्याच्या नावाने एक ग्रुप तयार केला. रक्तदान शिबीराच्या माध्यमातून त्याच्या आठवणी ताज्या ठेवण्याचा प्रयत्न केला.
या शिबीराच्या माध्यमातून तसेच वर्षभरही गरजूंना रक्तदान करत सर्व मित्र परिवार रक्तदानाचे कार्य करत आहे. या शिबीरातून आजवर थायलेसिमिया, कॅंसर, ट्यूमर, ओपन हार्ट सर्जरी च्या पेशंटला रक्तदान केले गेले आहे. गुरुवार पेठेतील मराठा भांडेवाल्यांची धर्मशाळा येथे हे शिबीर संपन्न झाले.