पुणे विभागात करोनामुक्‍तीचे प्रमाण 1% ने घटले

गेल्या 24 तासांत 1 हजार 807 ने रुग्ण वाढ; पुणे जिल्ह्यात 1 हजार 505 नवीन रुग्ण

 

पुणे – मागील महिन्याभरापासून पुणे विभागात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. तर, करोनामुक्‍तीचे प्रमाण घटले असून जवळपास ते 97 टक्‍क्‍यांच्या जवळपास होते. आता त्यात घट होवून 95.38 टक्‍के इतके आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत विभागात 1 हजार 807 ने रुग्ण वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 505, सातारा 182, सोलापूर 67, सांगली 30, तर कोल्हापूर जिल्ह्यात 23 बाधित सापडले.

पुणे विभागातील आतापर्यंत 6 लाख 16 हजार 771 बाधित संख्या पोहोचली. त्यातले 5 लाख 88 हजार 296 बाधित बरे झाले. सध्या 12 हजार 145 बाधितांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 16 हजार 330 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्‍के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

जिल्हानिहाय करोनाची सद्य:स्थिती

पुणे जिल्हा
करोनाबाधित – 4 लाख 6 हजार 453
करोनामुक्‍त – 3 लाख 87 हजार 527
सक्रिय बाधित – 9 हजार 783
मृत – 9 हजार 143

सातारा जिल्हा
करोना बाधित – 58 हजार 604
करोनामुक्त बाधित – 55 हजार 699
सक्रिय बाधित – 1 हजार 55
करोनामुळे मृत्यु – 1 हजार 850

सोलापूर जिल्हा
करोना बाधित – 52 हजार 846
करोनामुक्त बाधित – 50 हजार 115
सक्रिय बाधित – 985
करोनामुळे मृत्यु – 1 हजार 836

सांगली जिल्हा
करोना बाधित – 48 हजार 475
करोनामुक्त बाधित – 46 हजार 560
सक्रिय बाधित – 157
करोनामुळे मृत्यु – 1 हजार 758

कोल्हापूर जिल्हा
करोना बाधित – 50 हजार 393
करोनामुक्त बाधित – 48 हजार 395
सक्रिय बाधित – 255
करोनामुळे मृत्यु – 1 हजार 743

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.