नवी दिल्ली – देशाची एकूण सक्रिय रुग्ण संख्या आज 1,64,511 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 86.37 टक्के रुग्ण या 6 राज्यातील आहेत.
मागील 24 तासात 16,752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8,623 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3,792 आणि पंजाबमध्ये 593 नवीन रुग्ण आढळले आहेत.
कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. आतापर्यंत एकूण 1.07 कोटी लोक बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 11,718 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,648 लोक बरे झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 51 मृत्यू झाले आहेत.