Pune Crime : दुसऱ्या मजल्यावरून फेकून मतिमंद मुलीचा खून

पुणे – अल्पवयीन मतिमंद मुलीने सज्ञान मतिमंद मुलीचा खून केला. संबंधित सज्ञान मुलीला दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या रॅम्पवरुन खाली ढकलण्यात आले. ही घटना डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान संस्थेमध्ये शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मतिमंद मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावली मतिमंद संस्थेमध्ये मृत 33 वर्षाची मुलगी दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या रॅम्पवरुन जात होती. तेवढ्या अल्पवयीन मतिमंद मुलीने तिला मागून पकडून दुसऱ्या मजल्यावरुन जिन्यातून खाली फेकून दिले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एल. घोडके करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.