प्रा. दिगंबर दुर्गडे : खळदमध्ये संरपंच, पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सासवड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अल्पावधितच राज्यात भरघोस यश मिळाले. यापुढेही कार्यकर्त्यांनी पक्ष भक्कमपणे बांधण्याचे काम केले पाहिजे. लोकांना विश्वास दिला की माणसे आपल्याकडे येतात . लोकांमध्ये जावे लागेल, सोशल मीडियावरही सक्रिय झाली पाहिजे, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
खळद (ता. पुरंदर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आढावा बैठक, कार्यकर्त्यांच्या निवडी व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा पार पाडला. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, पुरंदर हवेलीचे अध्यक्ष वामन जगताप, सोमेश्वर कारखाने संचालक बाळासाहेब कामथे, ईश्वर बागमार, शांताराम कापरे, जितेंद्र निगडे, विश्वास जगताप, सभापती शरद जगताप, तानाजी जगताप, लक्ष्मण गोफने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वंदना जगताप : पुरंदर तालुका महिला अध्यक्ष, अमित झेंडे: युवक तालुकाध्यक्ष, संदेश पवार : विद्यार्थी तालुकाध्यक्ष, तेजपाल सणस: सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, रामभाऊ काळे : सेवा दल तालुकाध्यक्ष, अनुराग टिळेकर: वकील सेल तालुकाध्यक्ष, किरण गदादे : ओबीसी सेल तालुकाध्यक्ष, अविनाश भालेराव : सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष, नदीम सय्यद : अल्पसंख्यांक सेल, आश्रू वणवे: व्हीजेएनटी सेल, अशोकराव बरकडे: पदवीधर सेल, अक्षय लिंबोरे, पदवीधर सेल. विक्रम काकडे : कार्याध्यक्ष पदवीधर सेल, जालिंदर खैरे
: किसान सेल, नंदकुमार निरगुडे : व्यापार व उद्योग सेल कार्याध्यक्ष, कोमल निगडे : महिला कार्याध्यक्ष, हनुमंत माहुरकर: जिल्हा सरचिटणीस, सदाशिव खेेसे: जिल्हा सरचिटणीस, सविता भुजबळ : जिल्हा सरचिटणीस, तनुजा शहा : जिल्हा सरचिटणीस- प्रमोद जगताप : तालुका उपाध्यक्ष सचिन काकडे : तालुका सरचिटणीस या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
सूत्रसंचालन ईश्वर बागमार यांनी केले. बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.