सरपंचाचा पराभव करत गणेश सरोदे ठरले जायंट किलर
निमोणे – शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव करत तरुणाईने सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या रामलिंग परिवर्तन पॅनलने माजी लोकनियुक्त सरपंच विलास कर्डीले यांच्या सरदवाडी विकास आघाडी पॅनलचा पराभव करत 8/1 अशा मताधिक्याने सत्ता काबीज केली आहे.
सरदवाडी (ता. शिरूर) हे गावं पुणे-नगर रस्त्यावरील महत्वाचं असून गेले पाच वर्षे या गावात राष्ट्रवादीचे विलास कर्डीले हे लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाचा कारभार पाहत होते; परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत प्रचार यंत्रणा राबवत सत्ताधाऱ्यांचा पराभव करत एकतर्फी विजय खेचून आणला.
अन् रिक्षा स्पीडने सुसाट पळाली…
सरदवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. सरपंचपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यांचे चिन्ह हे ऑटोरिक्षा होते, त्यांचे पती बाळासाहेब जाधव हे रिक्षाचालक आहेत व त्यांना निवडणूकीत चिन्ह सुद्धा रिक्षाच मिळाल्याने, सगळीकडे रिक्षा सुसाट वेगाने पळाली अशीचं चर्चा सुरु आहे.
निवडून आलेले उमेदवार
लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव (सरपंच), उमेश सरोदे, सोमनाथ सरोदे, मोनाली कर्डीले, गणेश सरोदे, शिल्पा घावटे, विद्या सरोदे, आशा घावटे, सुरेखा निरवणे, कृष्णा घावटे.