रांजणगाव गणपती – कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथील एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांना रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) घडली आहे. याबाबत शोभा आहेर (वय 27 रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दगडू कर्डीले, नितीन कर्डीले, गंगाराम कर्डीले, योगेश कर्डीले, संदीप कर्डीले, संगीता मोरे, लिलाबाई कर्डीले, सुभद्रा कर्डीले, उषा कर्डीले, मीनाक्षी कर्डीले यांना अटक केली आहे. पुढील तपास ए. आर. चमनशेख करीत आहेत.