सचिवपदी भोरचे पद्माकर डोंबाळे यांची बिनविरोध निवड
भोर – जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. यावेळी अध्यक्षपदी तुकाराम शिंदे आणि सचिवपदी पद्माकर डोंबाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन घटना दुरुस्तीचे अध्यक्ष व पतसंस्था कार्यलक्षी संचालक अनिल कुंभार, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल घोळवे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पुणे विभागीय महिला संघटक सुप्रिया सांडभोर,
महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे राज्य संघटक पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष व पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक श्रीकांत वाव्हळ, युनियनचे कार्याध्यक्ष आणि स्वीकृत संचालक संदीप ठवाळ, कृषी तांत्रिक संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष नवनाथ झोळ,
कायदे विषयक सल्लागार हनुमंत भंडलकर, मानद कायदे सल्लागार अभय निकम, पुंडलिक म्हस्के प्रसिद्धी प्रमुख पुणे जिल्हा, मावळते सचिव देवदत्त सांडभोर आदींसह ग्रामसेवक सभासद उपस्थित होते.