बारामती आरटीओत प्रकार : काही एजंटाकडून दबावअस्त्र
जळोची – आपल्या मर्जीतील व वाहनांची बेकायदेशीर कामे करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकांची वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी ड्युटी लावा, असा आग्रह थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात जात एजंटचा एक चमू करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय नियमानुसार कार्यालय प्रमुख हे वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करण्यासाठी स्टाफमधील कोणत्याही एका मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती करीत असतात. मात्र, एजंट वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरडाओरडा करत आमच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नेमणूक का करत नाही, अशी विचारणा केली जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन मालकांची कामे करीत असलेले मध्यस्थ प्रतिनिधी एजंट हे आपल्याच मनासारखे काही बेकायदेशीर कामे करणारे मोटार वाहन निरीक्षक यांचीच नियुक्ती करावी. त्यांची कायदेशीररित्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची ड्युटी लावलेली नसताना सुध्दा त्यांनी बेकायदेशीर वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची केलेल्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आम्हाला का देत नाही.
याकारिता विद्यमान नगरसेवक व त्यांचे सहकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात बसलेले होते. अंदाजे ४० मध्यस्थ एजंट, प्रतिनिधी यांचा घोळका कार्यालय प्रमुख यांच्या कक्षात आला. बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय प्रमुख यांनाच काही मोजकेच मध्यस्थ एजंट, प्रतिनिधी जोरजोरात आवाज चढवून कार्यालय प्रमुख यांच्याशी बोलतात.
राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) बहुतांश काम हे ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे मध्यस्थ अथवा एजंट, प्रतिनिधी यांना राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा आदेशच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही आरटीओ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मेन गेटमधून कोणत्याही वाहन मध्यस्थ एजंट, प्रतिनिधी यांना प्रवेश देऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असूनही बारामती कार्यालयात मध्यस्थ एजंट, प्रतिनिधी न्यायालयाचे आदेश असूनही बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात तसेच कक्षात ४०, ४० मध्यस्थ, एजंट, प्रतिनिधी जात आहेत.
श्रीरामपूरची पुनरावृत्ती बारामतीत होईल
बेकायदेशीर तपासणी केलेल्या वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची फिटनेस सर्टिफिकेट आम्हाला मिळालीच पाहिजेत म्हणून कार्यालय प्रमुखांशी हुज्जत घातली. नगरसेवक व सहकारी सुध्दा तेथेच उपस्थित होते. हा प्रकार नगरसेवकांच्या सहकाऱ्यांसमोर घडला आहे. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मारहाण प्रकरणाची पुनरावृत्ती बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात घडलेल्या प्रकाराबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.