पिरंगुट : मुळशीत वन विभागाकडून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. विविध प्रकारे जनजागृती करून स्थानिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत जागरूकता वाढवून मुळशी वन विभागाकडून यावर्षीचा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन मार्फत विविध स्तरावर वन्यजीव साप्ताह साजरा करण्यात येतो. स्थानिक शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, लोकवस्तीची ठिकाणे इ. मध्ये वन्यजीव संरक्षण व संवर्धन बाबत तसेच मानव व वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी हा सप्ताह साजरा करण्यात आला. मुळशी वन विभागाच्या माध्यमातून तसेच एनिमल रेस्कू टीम बावधन पुणे यांचे मार्फत सर्पदंश,
जखमी वन्यप्राणी प्रथमोपचार, शेतात काम करतना घ्यावयाची काळजी, मानव- वन्यजीव संघर्ष, वने- वन्यजीव संरक्षण व संवर्धन इ. बाबत पिरंगुट इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी विद्यालय पौड येथे छायाचित्रे- चित्रीकरण दाखवुन शालेय विद्यार्थ्यामध्ये मुलांमध्ये जनजागृती करून पर्यावरनाविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच मुलांच्या पर्यावरण विषयी कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येऊन प्रोत्साहनपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम मुख्य वनसंरक्षक पुणे वनवृत्त एन आर प्रवीण, उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक पुणे मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल नंदकुमार शेलार, कल्याणी मच्चा यांनी राबवला. यावेळी वनविभागाचे वनरक्षक सारिका दराडे, भरत सावंत, गणेश धूळशेट्टी, कांचन ढोमसे आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे आयोजन
यावर्षी मुळशी वन विभागातर्फे दि. 01 – 07 ऑक्टोबर 2023 वन्यजीव साप्ताह कालावधीमध्ये संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये विविध भागातील शाळा, महाविद्यालये, संस्था, ग्रामपंचायत कार्यालये इ मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा इ. विषयाबाबत वनविभाग पौड यांनी नियोजन केले असून ते उत्स्फूर्तपणे राबणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.