हिट अॅन्ड रन कायदा रद्द करण्याची मागणी
वाघोली – हिट अॅन्ड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पूर्व हवेली चालक कामगार संघटनेने वाघोलीत निषेध आंदोलन केले. कायदा रद्द झाला नाहीं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.
वाघोली बाजारतळ मैदानात झालेल्या या निषेध आंदोलनात वाघोली, लोणीकंद, भावडी, फुलगांव व परिसरातील चालक सहभागी झाले होते. यावेळी या कायद्याच्या विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या. हा कायदा म्हणजे चालका वर अन्याय आहे.
कोणताही अपघात हा जाणून बुजून केला जात नाही. तो अवधनाने होतो. अपघात झाल्यास चालक देशोधडीला लागतील. असा कायदा करणे म्हणजे चालकाला जिवंतपणी मरण्यासारखे आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी चालकांनी व्यक्त केली. लोणीकंद पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.