शिंदे वासुली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा सप्ताह अंतर्गत सामाजिक, लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
यावेळी चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, गुलाबराव खांडेभराड, प्रीतम अण्णा शिंदे, बाळासाहेब नाणेकर, चाकण शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक गंभीर, राजगुरूनगर युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर होले, सरचिटणीस सागर राळे, सरचिटणीस संदीप दसगुडे, उपाध्यक्ष केतन लगड, उपाध्यक्ष दत्ता वनगरे, पंचायत समिती गण अध्यक्ष नसीम पठाण, प्रथमेश राळे, शरद निखाडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय रौंधळ, कोये गावचे उपसरपंच सागर राळे, ग्रामपंचायत सदस्य विजय सावंत, संतोष देवकर, तुकाराम सावंत, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप दजगुडे, विशाल तोत्रे , सौरभ तोत्रे आदी
उपस्थित होते.
करोना करोनाच्या बिकट परिस्थितीत अनाठायी खर्च न करता लोकाभिमुख, विधायक, लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. गुरुवारी (दि. 17) तारखेला चाकण एसटी स्टॅण्ड व राजगुरूनगर येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करून अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. तर 70 दिव्यांगांना आरोग्य साहित्य वाटप आणि महाळुंगे इंगळे कोविड सेंटर येथे फळ वाटप अस उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, भाजयूमो तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण व भाजयूमोचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव यांनी सूत्रसंचालन तर संघटन सरचिटणीस चेतन बर्गे यांनी आभार मानले.