पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
या औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800-222-365 वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा