भवानीनगर – इंदापूर तालुका राष्ट्रवादी किसान सेलच्या अध्यक्षपदी परशुराम रायते यांची निवड करण्यात आली.
सणसर (ता. इंदापूर) येथील परशुराम रायते यांनी आजपर्यंत विविध संस्थांवर चांगल्या प्रकारे काम केल्याने व त्यांच्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केल्याने पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदीप गारडकर यांनी परशुराम रायते यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी किसान सेल अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आचार विचार तसेच सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जनतेपर्यंत पोहोचून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी याही अगोदर परशुराम रायते यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे.
व इथून पुढील काळात देखील पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल अशी आशा बाळगून इंदापूर तालुका राष्ट्रवादी किसान सेल अध्यक्षपदी परशुराम रायते यांची निवड करण्यात आली आहे.