अवर सचिव पलांडे : कोरेगाव भीमामध्ये गौरव पुरस्कार सोहळा
कोरेगाव भीमा – विकसित भारताच्या स्वप्नांसाठी सदृढ सक्षम सुसंस्कारित युवा पिढीची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अवर सचिव किसन पलांडे यांनी केले.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेली विशेष गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे माध्यामिक व उच्च माध्यमिक विभागाचे सहसंचालक हरून आत्तार, लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे, पीएमआरडीए पुण्याचे उपायुक्त रामदास जगताप, पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव केल्याने मनाला एक आत्मिक समाधान लाभते. भविष्यात देखील व्यापक स्वरूपात असे सोहळे करण्याचा मानस आहे.
– सोमनाथ भंडारे, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिरूर हवेली.