हळदीकुंकू समारंभही उत्साहात :
पाबळ – शिरूर येथील बालाजी विश्व विद्यालयांमध्ये हळदी कुंकू व मातृ-पितृ पूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या विचारातून हळदीकुंकू समारंभाचे महत्त्व व आई वडील आणि मुलाचे नाते कशा पद्धतीचे असते याची माहिती देताना संस्कृतीचे महत्व विशद केले. पालकांनीही कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात डॉ. सोनाली हारदे, निता गायकवाड, अलका रुपनर तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊनसन्मान करण्यात आला. सर्व महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व वाण म्हणून हरिपाठ पुस्तकाचे वाटप करण्यात आले .
बालाजी विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्कारक्षम कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता पोंदे यांनी तर उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक शैला चौरे, रेश्मा घार्गे तसेच सर्व महिला शिक्षकांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले
संस्थेच्या खजिनदार केशरताई पवार तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदशिव पवार यांचे दूर दृष्टीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्काराचे बीज देण्याचे विचार कृतीद्वारे सादर करण्याचा आग्रह असतो. याचा प्रत्यय बालाजी विश्व विद्यालयाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभातून आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाय धुवून पाद्यपूजा व औक्षण केले. आणि पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.