जुन्नर : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा सोमवारी (दि. 22) अयोध्या येथे संपन्न होत असून हिंदू समाज बांधवांच्या श्रद्धेचा आणि अस्तेच्या सोहळ्याच्या निमित्ताने जुन्नर परिसरातील श्रीराम भक्तांमध्ये मोठे उत्साही वातावरण असून यादिवशी जुन्नर व परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जुन्नरमधील श्रीराम मंदिरे तसेच मारुती मंदिरांवर ध्वजपूजन श्रीराम प्रतिमा पूजन, सामूहिक रामरक्षा, हनुमान चालीसा पठण, भजन, श्रीराम झाकी मिरवणूक, श्रीराम नाम जप, दीपोत्सव, महाआरती,
महाप्रसाद भंडारा, संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शहरातील रविवार पेठ, सराई पेठ, कल्याण पेठ, खालचा माळीवाडा, वरली आळी आदी ठिकाणी करण्यात आलेले आहे.
अयोध्या येथील या सोहळ्याबाबत समाज बांधवांमध्ये आनंदी वातावरण असून यादिवशी जुन्नर परिसरात दिवाळीचा आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरातील विविध भागात भगवे झेंडे, श्रीराम प्रतिमा लावण्यात आलेल्या असून शहर श्रीराममय झालेले आहे.