अंडरपासजवळ दूध, दुग्धजन्य पदार्थ्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला
चालक, क्लिनर थोडक्यात बचावले
कापूरहोळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर मध्यरात्री एकच्या सुमारास साता-याकडून पुण्याकडे निघालेला गोविंद दूध डेअरीची दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक (कंटेनर) कापूरहोळ (ता. भोर) अंडर पासजवळ मुख्य रस्त्यावरून मेटल क्रेश बॅरीअर तोडून थेट सेवावर उलटला त्यामुळे गाडीचे प्रचंड नुकसान होऊन दूध व दुग्धजन्य पदार्थचे भरलेले कॅरेट सर्व्हिस रस्त्यावर पडले या अपघातात वाहन चालक व क्लिनर सुदैवाने थोडक्यात बचावले.
फलटण येथील गोविंद दूध डेअरीची दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक (एमएच Mh12 एसएफ 2167) कापूरहोळ येथे महामार्गावरून थेट श्री शिवाजी विद्यालय भाग शाळा कापूरहोळ येथील सेवा रस्त्यावरवर उलटला. या अपघातातील डायवर व क्लिनर सुदैवाने बचावल्याने कापूरहोळ चौक हा आता अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे.
या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे. हा अपघात रात्री घडला म्हणून जीवितहानि झाली नाही. जर हाच अपघात दिवसा घडला असता तर या ठिकाणी अंडरपास असून या ठिकाणी लहान मुले-मुली, ज्येष्ठ नागरीक आणि गावातील ग्रामस्थांची सतत रहदारी असते. चौकात उड्डाण पूल नसल्याने ग्रामस्थांना शाळेजवळील पब्लिक अंडरपासमधून ये-जा करावी लागते. कापूरहोळ येथे सतत होणार्या अपघातांमुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.