आळंदी – खेड तालुक्यातील आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात सुरुवातीला संस्था सचिव प्राचार्या वैष्णवी गुळवे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर संस्था अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य विजय गुळवे यांनी दीपप्रज्वन केले.
त्यांनतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनिंनी आपल्या भाषणांतून फुले दाम्पत्याने केलेल्या शैम्णिक व सामाजिक कार्याचा गुणगौरव केला. तसेच प्राथमिक व माध्यमिक दोन्हीही विभागातील विद्यार्थिनींनी आपल्या कविता व गीते सादर केली.
प्राथमिकच्या तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर एक छोटी नाटिका ही सादर केली. प्राथमिक व माध्यमिक विभागातील काही छोट्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती. सर्व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले होते.