राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा तालुक्यातील अनेक गावात गोरगरीब काबाडकष्ट करुन खाणाऱ्या कुटूंबियांकडे आधारकार्ड,रेशन कार्ड आणि मतदान यादीत संबंधित गावात गोरगरीबांचे नांवे असतांनाही अनेक गोरगरीब अशिक्षित लोक शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांना शासनाचा हक्काचा निवारा तरी नेमका कधी मिळणार? असा संतप्त सवाल शासनाच्या घरकुल यादीत नांवे असतांनाही ज्यांना अद्याप घरकुले मिळालेली नाहीत अशा वंचित घटकांकडून केला जात आहे.
तालुक्यातील भेंडा खुर्द गांवासह अनेक गावात अशा लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी असल्याचे दिसून येत आहे गोरगरीब मोलमजुरी करुन आपली उपजिका चालविणारे दररोज काबाडकष्ट करत असतांना त्यांना शासनाचा निवारा घरकुल यादीच नांव असतांनाही नेमका कधी मिळणार? अशी आर्तहाकही गोरगरीबांकडून मारली जात अाहे माञ पितळाची काने असणाऱ्या पंचायत समिती घरकुल विभागातील अधिकाऱ्यांना गोरगरीबांचा आवाज ऐकू येणार का?असा सवाल शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असणाऱ्या गोरगरीबांकडून उपस्थित केला जात आहे.
अनेक लाभार्थी शासनाच्या घरकुल यादीत असतांना आणि त्यांचे नांवेही यादीत आलेले असतांनाही गांवपुढारी माञ आपल्या हेकेखोर वृत्तीतून “हमारीच सुनो” करुन गोरगरीबांना उडवा – उडवीचे उत्तरे देवून हाकनाक पंचायत समितीचे दारे झिजवायला लावत असल्याचे दुर्देवी चिञ सध्या दिसून येत आहे त्यामुळे अनेक विधवा,विधुर व घटस्पोटीत महिलांसह गोरगरीब लोक शासनाच्या घरकुल योजनेत समावेश होवूनही प्रत्यक्षात त्यांना माञ घरकुल योजनेच्या लाभापासून चारहात लांबच असून गांवपुढाऱ्यांच्या तालावर ग्रामसेवक नाचत असल्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ देणारे गांवपुढारीच गोरगरीबांना हाकनाक ञास देवून उडवाउडवीचे देत उत्तरे असल्याच्या तक्रारी तालुक्यातील जनतेतून गांवपुढारी व ग्रामसेवकांच्या विरोधात स्पष्टपणे करत असतांना याचा बोध वरिष्ठ अधिकारी घेणार का?असा संतप्त सवालही व्यक्त क्ला जात आहे.