मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांचे आवाहन
मंचर – शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शाश्वत मच्छी पालन व्यवसाय करावा. त्याला शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते, अशी माहिती मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे मच्छी व्यवसायिक, मासेमारी करणारे लोक व माशासी सलग्न सर्वांनाच शासकीय योजना व इतर गोष्टींची माहिती व्हावी, माशांचे संगोपन-संवर्धन कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन करताना किरण वाघमारे बोलत होते. यावेळी मत्स्य विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. पाटील, संतोष खामकर, विवेक तोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
येणाऱ्या कालखंडात मासे कसे राहतील, यासाठी जे नैसर्गिक स्रोत आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची, याबरोबरच गोड्या पाण्यात मासेमारी कशी करायची, मत्स्यबिज कसे सोडायचे, मच्छीमार बांधवांसाठी असणा-या योजना, विमा, किसन क्रेडिट कार्ड या सर्व गोष्टींचे मंचर येथे माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. मच्छीमार बांधवांना माहिती पोहोचवण्याची काम आपण करत आहोत.
आपल्याकडे तीन प्रकारची मासेमारी होते. गोड्या पाण्यातली मासेमारी, खाऱ्या पाण्यातली समुद्रातील मासेमारी व खाडीतील मासेमारी करतो. या ठिकाणी आढळणारे मासे हे विविध जातीचे आहेत. हे माशांचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो, असे सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्यसेवा केंद्राचे राहुल गायवळ, , मत्स्यव्यवसाय विभागाचे भिमाशंकर पाटील, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,कनिष्ठ लिपिक लालासो कदम, समाधान शिंदे, रोहीत मंडले व ऋतुजा निवसे यांनी परिश्रम घेतले.
मत्स्यशेतीसाठी शासनाच्या योजना
एक हेक्टरी तलावासाठी अनुसूचित जातीच्या मतेसाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. 40 टक्के लाभार्थीला खर्च करावयाचा आहे. मत्स्यव्यवसायासाठी 95 योजना राबवल्या जातात. या योजना राज्य व केंद्र सरकारमार्फत राबवल्या जातात.