मिरची कांडप, आटाचक्कीचा शुभारंभ
चिंबळी – महिला उद्योजकतेसाठी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया व शॉक फाउंडेशनकडून मिरची कांडप आणि पल्व्हरायझर (आटा चक्की) मशीनचे उद्घाटन करून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे. त्याअंतर्गत कुरुळी, डोंगरे वस्ती येथे महिलांना मसाला बनविणे प्रशिक्षण देण्यात आले होते व त्यानंतर महिलांनी मसाले बनवून विक्री करून व्यवसायाची सुरवात केली आहे.
यासाठी हॅन्ड इन हॅन्ड इंडियाकडून व्यवसाय सुरू केलेल्या स्त्री शक्ती महिला बचत गटातील महिलांना मिरची कांडप तसेच पल्व्हरायझर (आटा चक्की) मशीनचे उद्घाटन करण्यात आले,
यातून त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमासाठी उपसरपंच दीपक डोंगरे, हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, मनीषा गायके, सुवर्णा करपे, शेखर खराडे, स्त्री शक्ती बचत गटातील सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते.