मंचर – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चासचे सुपुत्र भारतीय लष्करातील गणेश चासकर यांच्या वतीने येथे ५१ दिव्यांगांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रा. अनिल निघोट, नायब तहसीलदार सचिन वाघ, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, सरपंच अर्चना बारवे, उपसरपंच कविता चासकर, ग्रामसेवक राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य किट भेट देणारे भारतीय लष्करातील गणेश चासकर, निरंजन चासकर, संजय चासकर, कृष्णा बारवेकर, सलिम इनामदार, दत्ता बारवे उपस्थित होते. यावेळी सुरेश भोर, प्रा. अनिल निघोट, सचिन वाघ यांनी दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.