डोर्लेवाडी – धनगर आरक्षणाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी बारामती येथे धनगर बांधव चंद्रकांत वाघमोडे हे गेले नऊ दिवस आमरण उपोषण बसले आहेत. या उपोषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
शुक्रवारी (दि. 17) सकाळपासूनच ग्रामीण भागातील गावोगावी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको केला तर झारगडवाडी येथे बांधवांनी बारामती वालचंदनगर रोडवर मेंढरे रस्त्यावर आणून अनोख्या पद्धतीने रास्ता रोको करण्यात आला.
झारगडवाडी येथे उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्या सूचनेनुसार गाव बंद ठेवून रस्त्यावर मेंढर आणून बारामती वालचंदनगर रस्ता अर्धा तास अडवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. सोनगाव, मेखळीमध्ये देखील गाव बंद आणि रस्ता रोको करण्यात आला.