डॉ. मोहन भागवत यांचा मंदिरातर्फे सत्कार
आळंदी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी (दि. 5) माऊली मंदिरात जाऊन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत पूजन केले.
आळंदी येथे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,यात भागवत यांनी मार्गदर्शन केले. तत्पुर्वी ते माऊली मंदित लिन झाले होते.
यावेळी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा शाल, श्रीफळ व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्ताने ग्रंथ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
आळंदी (ता. खेड) : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दर्शन घेतले.