ओझर – अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये सकाळी पायी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी श्री विघ्नहरासमोर ग्रंथांची आरास करण्यात आली होती.
पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त श्रीराम पंडित, राजश्री कवडे आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली.
महाआरतीचा मान गणेशभक्त चंद्रशेखर डुंबरे, मंगेश येंधे ,संदीप जंजिरे, अभिजीत भोमिक, अमोल शहा यांना मिळाला. सकाळी ७.३० वा. आणि दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८ वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा. ‘श्री’स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला. चंद्रोदयापर्यंत हभप अॅड. नरसिंग बेन्दंगे, मांजरी पुणे यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळा शिरोली यांनी दिली. गणपत दगडू बोडके, ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले. सायंकाळी ७ वाजता धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.
आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, रंगनाथ रवळे, आनंदराव माडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांनी केले.