पौड – मुळशी तालुक्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 96.09 टक्के लागला असून, उत्तीर्णांमध्ये मुलींनीच बाजी मारली. तथापि गतवेळच्या तुलनेत यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा मात्र घसरली. पौड आणि पिरंगुटच्या वाणिज्य, मारूंजी आणि पिरंगुट चाणाक्यच्या विज्ञान आणि सूर्यदत्ताच्या व्होकेशनल या पाच विभागांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
पौड, पिरंगुट, भूगाव, हिंजवडी, कासारआंबोली, ताथवडे, मारूंजी, भांबर्डे, उरवडे, बावधन, माण या अकरा ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बारावीचे वर्ग आहेत. पौड, पिरंगुट, बावधनला व्यवसाय अभ्यासक्रमाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळांमधून 2 हजार 662 विद्यार्थी परीक्षेला बसले होत, त्यापैकी 2 हजार 558 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 94.26 तर मुलींचे प्रमाण 96.64 टक्के आहे. पौड विद्यालयात वाणिज्य विभागाच्या सुहास संजय हुलावळे यांने 93.33 टक्के गुण मिळवून पहिला तर 89.83 टक्के गुण मिळवून आदित्य कल्पेश राऊत दुसरा आला. प्राचार्य एस. व्ही. भोकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तालुक्यातील शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे – श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड (कला 96.66, वाणिज्य 100, व्यवसाय 96.82), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला 91.26, वाणिज्य 100, विज्ञान 98.19, व्यवसाय विभाग 97.50), न्यू इंग्लिश स्कूल, हिंजवडी (कला 90.62, वाणिज्य 96.34), माध्यमिक विद्यालय, भूगाव (वाणिज्य 95.91), राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, कासारआंबोली (विज्ञान 88.70), बालाजी ज्युनियर कॉलेज ताथवडे (विज्ञान 99.02, वाणिज्य 97.45), मारूंजी विद्यालय (वाणिज्य 97.90. विज्ञान 100),
संपर्क विद्यालय, भांबर्डे (वाणिज्य-55.55), सूर्यदत्ता महाविद्यालय, बावधन ( कला – 97.67, वाणिज्य – 94.36, विज्ञान 94.89, व्यवसाय विभाग 100), अनुसया ओव्हाळ विद्यालय (कला 92.30, वाणिज्य 90.90), माध्यमिक विद्यालय, उरवडे (वाणिज्य 84.84), चैतन्य ज्युनियर कॉलेज, नांदे (विज्ञान 99.28), चाणाक्य ज्युनियर कॉलेज, पिरंगुट (विज्ञान 100), अकेमी ज्युनियर कॉलेज (विज्ञान 98.71, वाणिज्य 97.26).