चिंबळी – मोई येथील स्व. ज्ञानेश्वर रामभाऊ मेदनकर यांच्या स्मरणार्थ मेदनकर कुटुंबाकडून श्री भैरवनाथ महाराज मंदिरातील मुख्य गाभार्यात 8.190 किलो चांदीचा उंबरा बसविण्यासाठी तो मंगळवारी (दि. 23) श्री भैरवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला.
एक सामाजिक कार्य व दायित्व समजून युवाउदोजक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष ज्ञानेश्वर मेदनकर, माजी उपसरपंच देविदास ज्ञानेश्वर मेदनकर यांच्या वतीने हा उंबरा अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.