नारायणगाव – येथील सबनीस विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीमधील वय 10 ते 14 वयोगटातील 300 विद्यार्थिनींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली असल्याची माहिती रोटरीचे क्लब नारायणगावचे अध्यक्ष संदीप गांधी यांनी दिली.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, जिविका फाउंडेशनच्या डॉ. रिद्धी मकवाना, डॉ.ज्योती शिंदे, डॉ.गायत्री, प्रथमेश सरगडे, सुदर्शन आनंदकर, रेखा वाव्हळ, कांचन वाघ ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी,
सहकार्यवाह अरविंद मेहेर, ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई आतार, सबनीस विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, उपमुख्याध्यापक सतीश तंवर,पर्यवेक्षिका सुषमा वाळिंबे, पर्यवेक्षक विलास शिंदे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ,विद्यार्थिनी उपस्थित होते. जीविका फाउंडेशन व रोटरी क्लब नारायणगाव, बिबवेवाडी (पुणे) सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन रोटरीचे मंगेश मेहेर, डॉ. रुपेश कामठे, डॉ. प्रशांत काचळे, डॉ. योगेश पाटील, योगेश भिडे, ब्रिजेश बांदिल, सचिन घोडेकर, वर्षा गांधी, अमृता भिडे, निर्मला मेहेर यांनी केले. सूत्रसंचलन हेमंत महाजन यांनी तर मंगेश मेहेर यांनी आभार मानले.